विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणीमध्ये कॅश व्हानची तपासणी केली असता, 69 लाख रुपयांची रोकड मिळून आली. यापैकी 61 लाख रुपयांची कागदपत्रे सादर झाली असली, तरी 8 लाख रुपयाच्या रोख रकमेची कागदपत्रे न मिळाल्याने वाहन पिंपळगाव बसवंत पोलीसच्या ताब्यात देण्यात आले आहे.या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचनामा करून पुढील चौकशीसाठी 69 लाखाची रोकड व गाडी असा एकूण 79 लाख रुपयांचा मु्देमाल जप्त केला आहे.
या घटनेचा अधिक तपास आयकर विभागाचे अधिकारी संदीप जुमले करीत आहेत.
Discussion about this post