
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा : मानोरा येथिल ग्रामिण रुग्णालया अंतर्गत पंचायत समिती सभागृहात १४ नोव्हेंबर २०२४ रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला आहे.
यावेळी मानोरा वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.पी. नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला व बालविकास अधिकारी अनुप कदम यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना समुपदेशक हरी काळे यांनी आजाराची लक्षणे काय असतात, वयोमानानुसार होणारे आजार याविषयी काळजी कशी घ्यायची व उपचार आहार याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच ओपीडी मध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांनी सुद्धा नियमित मधुमेह तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच नेहमीत व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. याविषयी मार्गदर्शन केले यावेळी या कार्यक्रमाला सहकारी आकाश सावंत (पुनर्वसन कर्मचारी) उपस्थित होते.
तर सहकार्य म्हणून पर्यवेक्षिका ज्योती महल्ले, हेमलता राऊत, व इतरांनी केले आहे..
Discussion about this post