- पांढरकवडा =स्थानिक विकास हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय 09 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. सुनील पितलिया प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रमोद तालकोकुलवार हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. तालकोकुलवार यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले याप्रसंगी सिमरन चव्हाण, निशा आडे, प्रा.सोमेश्वर केराम यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त व क्रांती दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सोमेश्वर केराम यांनी केले. संस्थेचे सचिव मा. श्री आनंद भाऊ वैद्य प्राचार्य सौ अनुश्री वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
Discussion about this post