प्रतिनिधी :- अहमद अन्सारी
98 पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार रोजी शांततेत मतदान पार पडले.बूथ क्रमांक 33 कुंभारी ता.परभणी व बूथ क्रमांक 377 खड्का ता.सोनपेठ या दोन बूथ वरील ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या निवडणूक प्रशासनाने तात्काळ दुसऱ्या ईव्हीएम मशीन ची व्यवस्था करून मतदान सुरुळीत सुरू करण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेले मतदान काही केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते लोकसभेपेक्षाही मतदारांचा उत्साह जास्त दिसून आला. पाथरी विधानसभा मतदार संघात 415 मतदान केंद्रावर 5 पर्यंत सरासरी62.08__ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अंदाजे 70 टक्के पर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून पाथरी विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालेले आहे.
सकाळपासून शहरी व ग्रामीण भागात बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या. सकाळ सत्रा मध्ये महिला मतदार घराबाहेर निघून उत्साहात मतदानासाठी मतदान केंद्रावर येत असल्याचे दिसून आले. मतदानाला प्रोत्साहन मिळावे म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागील महिनाभर पासून मतदान जनजागृतीवर विविध उपक्रम राबविण्यात आले व त्याची प्रसिद्धी मीडिया मार्फत ही खूप मिळाली यात प्रमुख्याने अपंग व 85 वर्ष पुढील वयोवृद्ध मतदार मतदान केंद्रावर येण्यास असक्षम असतील ते घरून मतदानाचा हक्क बजविण्यास इच्छुक असतील असे मतदारांचे त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्यात आले. यासह अन्य उपक्रम प्रथमच या निवडणुकीमध्ये राबविण्यात आल्याने मतदानावर याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. पाथरी विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली होती. 415 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती ठीक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. विशेषता महिला व युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत दोन तासात 7.36 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांचा उत्साह कायम राहिला 11 वाजेपर्यंत 20.61 टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रावर दुपारपर्यंत रांगा कायम होत्या दुपारी 1 वाजेपर्यंत 34.61 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांची संख्या कमी दिसून आली तर काही केंद्रावर उत्साह कायम दिसून आला दुपारी 3 वाजेपर्यंत 48.80 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.08 टक्के मतदान झाले त्यानंतर शहरी भागात अनेक मतदारांनी उशिराने गर्दी केल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.
सखी पोलिंग बूथ महिला टीमची यशस्वी कामगिरी
महिला सक्षमीकरण करण्याची संधी महिला कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा पाथरी तेथील 176 केंद्र क्रमांक बूथ सखी पोलिंग बूथ म्हणून प्रशासनाने तयार केले या बुथवर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती या कामी महिला मतदान अधिकारी यांनी आपले काम चोख बजावले.
दिव्यांग कर्मचाऱ्यांची यशस्वी कामगिरी
दिव्यांग कर्मचारी यांच्यासाठी एक स्वतंत्र पोलिंग बूथ पाथरी शहरातील गट साधन केंद्र येथील १५५ केंद्र क्रमांकावर सर्व दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक केली होती या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी ही निवडणुकीच्या सर्व कामे व्यवस्थितरित्या पूर्ण केले.
निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले सपत्नीक मतदान.
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी सकाळी 7 वाजता आदर्श मतदान केंद्र क्रमांक 126 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनांद्रा साखर कारखाना परिसर येथे जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.
————————‐
निवडणूक निरीक्षक श्रीमती संचिता बिश्नोई यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन केली पाहणी
पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ तालुका व परभणी ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक श्रीमती संचिता बिश्नोई यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रावरील सर्व बाबींची बारकाईने पाहणी केली.
सायं.6.40 वाजता पाथरी शहरातील बूथ क्रमांक 159 इंदिरा नगर येथील बूथ वरील टीम मतदान प्रकिर्या पूर्ण करून साहित्य घेऊन आली असता उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.रात्री उशिरापर्यंत इतर बूथ आपले मतदान साहित्य घेऊन येत होते सर्व अधिकारी कर्मचारी यांना रात्री रुचकर जेवणाची व्यवस्थाही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली होती.
Discussion about this post