प्रतिनिधी :- सतिश्र्वर नेवारे
गोंडपिंपरी :- दि.२०/११/२०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली. काही दिवसापासून वृत्तपत्र सोशल मीडियावर चालू असलेल्या. आदिवासी गोंड गोवारी जमातीचे निवडणुकीवर बहिष्काराचे वारे काल थांबले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात. समाज बांधवांनी सर्वानुमते बहिष्काराचा निर्णय घेतला होता तो काल विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली तिथे सर्वानुमते घेतलेल्या निर्णयात समाज बांधवांनी त्या निर्णयावर एकनिष्ठ राहून इतिहास रचला.
२०२४ हा वर्ष आदिवासी गोंड गोवारी समाजाचा इतिहास घडविणारा वर्ष आहे. कोणत्याही पक्षाला मतदान न करता संपूर्ण महाराष्ट्रातील जमातीने एकदा दाखवून १०० बहिष्कार टाकला. भारतात हा समाज पहिला ठरला आहे या समाजाण संविधानिक गोंड गोवारी जमात.संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून गेली एक वर्ष पूर्वीपासून वर्तमान शासनाविरुद्ध अनेक इतिहासिक आंदोलने केली.
त्यामध्ये या समाजाचे तीन योद्धे किशोर चौधरी,सचिन चचाने , चंदन कोहरे, यांचे संविधान चौक नागपूर येथील प्रथम १७
दिवस व नंतर १३ दिवस आमरण उपोषण समाविष्ट आहे. दोन्ही आमरण उपोषणामुळेच समाजाचे आंदोलने विशेष राहले.या सर्व आंदोलनानी नागपूर शहरातील गर्दीचा इतिहासाचा उच्चाक मोडलेला सर्वांनी बघितलेला आहे. आणि संघर्ष कृती समितीच्या स्टेटजी चे प्रमाणे २०/११/२०२४ चा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार स्वतःहून पुकारून सर्व सामान्य जमात बांधव भगिनींनी पूर्ण केला.
आदिवासी गोंड गोवारी जमातीचे हे बहिष्कार आंदोलन कोन्या एका पक्षाला फायदा किंवा नुकसान पोहोचवण्यासाठी नसून, दुसऱ्या एखाद्या पक्षाला मदत करणे किंवा समर्थन देण्यासाठी नव्हते, शासनाविरुद्ध होते. सर्व पुरावे सादर करूनही व ते बरोबर असल्याचे शासनाने मान्य करूनही. केवळ शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊन आदर्श आचारसंहिता लागू होईपर्यंत वेळकाढू धोरण स्वीकारल्याने निषेध म्हणून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार आंदोलन केले
Discussion about this post