माढा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने निवडणुकीमध्ये जी साथ दिली व मला विजयी शुभ आशीर्वाद दिले त्यामुळे हा विजय सर्व सामान्य जनतेचा, कार्यकर्त्यांचा नेते मंडळींचा आहे.असे विचार माढा विधानसभा निवडणुकीत विजयी घोषित केले असता अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.

तसेच माढ्यातील जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये जो शब्द दिलेले आहेत.ते पूर्ण करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागलो आहे. तर उसाच्या बाबतीमध्ये काही काळजी करू नका विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांच्याकडून करण्यात आले.माढा विधानसभा विजयानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.गेली तीस वर्षे जनतेची सत्ताधारी मंडळींनी दिशाभूल केली आहे.माढा मतदार संघात सर्वांगीण विकास करण्यासाठी साठी तसेच गेल्या तीस वर्षांपासून होत असलेली पिळवणूक याचा विचार पुर्वक निर्णय घेऊन मला भरघोस मतांनी विजयी केले आहे.मी माढा मतदारसंघातील जनतेचा आमदार म्हणून काम करताना कोणत्या प्रकारचा भेदभाव करणार नाही.मी शेतकऱ्याचा मुलगा माझा विजय हा शेतकरी बांधवांचा आहे. मला निवडणूक विजयासाठी प्रयत्न करुन मोठ्या मताधिक्यने विजयी केले अशा सर्वांचे व जनतेचे मी आभार मानतो असे ते म्हणाले.
Discussion about this post