एका लहान खेडेगावातून जन्म घेऊन ज्यांनी गावच्या सरपंच पदाने समाजकारण आणि राजकारणात प्रवेश मिळवला तो केवळ संताच्या विचाराने प्रेरित होऊनच.सरपंच असताना गावातील समाजपयोगी कामे कशी करावी? त्या साठी कोणत्या यंत्रणेचा उपयोग करावा? याचे बाळकडू अगदी तारुण्यातच मिळाले होते.गळ्यात पांडुरंगाची माळ आणि आळंदीचे, पंढरीचे, प्रचंड वेड हे नसानसांत भिनले होते.स्वर्गीय नारायण राव पवार यांच्या तालमीत तयार झालेले हे दुर्मिळ रत्न तालुक्याच्या इतिहासात चमकू लागले होते.कोणतेही यश मिळवण्यासाठी कोणत्यातरी पराभावाची चव चाखावी लागते ते सुद्धा त्यांच्या नशिबी आले होते.त्या पराभवातून त्यांनी स्वतःला तर सावरलेच परंतु एका नवीन उमेदीने समाज कार्यात सक्रिय राहिले आणि त्याचाच परिणाम म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या ते सदस्य पदी निवडून आले.जिल्हा परिषद सदस्य झाल्या नंतर त्यांची समाज कार्याची भूक मोठ्या प्रमाणात वाढली होती.ज्या क्षेत्रात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पहात होते ,त्या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केलीच परंतु त्यांचे कार्यक्षेत्र नसलेल्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या सुख दुःखामध्ये सातत्याने जात राहिले.त्याची परिणीती म्हणून जनसंपर्क वाढला ,तळागाळातल्या लोकांना ते आपलेसे वाटू लागले.त्यांनी समाजात वावरत असताना लोकांच्या भावना विचारात घेतल्या.
महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून ज्यांची अलीकडील काळात ओळख झाली ते आदरणीय शरदचंद पवार साहेब नेहमी म्हणतात राजकारणात जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या त्या ठिकाणची बलस्थाने ओळखता आली पाहिजे आणि नेमके हेच धोरण त्यांनी अवलंबले होते.बैलगाडा शर्यत काही प्राणिमात्र संघटनेने बंद पाडली होती.ती उठवण्याकरिता महाराष्ट्रातील बऱ्याच जनांनी प्रयत्न केला.ही शर्यत बरीच वर्षे बंद होती.सुरुवातीचे बैल गाडा घाट हे शेवटच्या घटका मोजत होते.घाटांची दुरावस्था झाली होती.आणि इकडे मात्र ही बंदी हटवली होती.शर्यती करायच्या तर घाट होणे गरजेचे होते.काही गावातील पुढारी मंडळी तालुक्याचे असणारे नेते मंडळी कडे गेले परंतु त्यांच्या पदरी निराशा आली, अशा वेळी नेमकेच आदरणीय काळे साहेब मदतीला धावून आले,स्वखर्चातून त्यांनी गावोगावी घाट बांधून दिले.प्रत्येक गावातील सर्वसामान्य नागरिक काळे साहेबांकडे प्रेषित म्हणून पाहू लागले.
तालुक्याचा पश्चिम पट्टा म्हणजे सांप्रदायिक क्षेत्रातील अग्रगण्य भाग होय.वैकुंठ निवासी भिकाजी बाबा वाजवणे कर महाराज यांनी गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह भरवण्यास सुरुवात केली होती.हरिनामाचा व्यासंग प्रत्येक गावांतून जडला होता.प्रत्येक गावांतून या सप्ताह करीता अन्नदान म्हणून काळे साहेब नेहमी आघाडीवर राहिले.
वाड्या, वस्त्या, गावठाण, मिळून बनलेला हा तालुका आध्यात्मिक बाबतीत मोठा जागरूक राहिलेला आहे.मंदिरांचे शेड,मंदिरापुढील भाग ब्लॉक टाकून देणे ,पाण्याची व्यवस्था, लाईटचा असलेला प्रॉब्लेम,एस. टी.ची सोय ही कामे करत करत त्यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला.हा अर्ज भरण्याअगोदर त्यांनी तळागाळातल्या लोकांची मते आजमावून घेतली,सर्व सामान्य माणसांच्या सूचना त्यांना ज्या प्राप्त झाल्या त्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.आणि मगच त्यांनी निवडणुकीचे पाऊल उचलले होते.
युती आणि आघाडी यांची जुगलबंदी सगळ्या महाराष्ट्राच्या वाट्याला आली होती. काळे साहेब उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आपले नशीब आजमावू पहात होते.तर तालुक्यातील इतर ही नेते मंडळी आमदार पदासाठी इच्छुक होती.त्यांनी सुद्धा आप आपले फॉर्म भरले होते.ज्यावेळी हे फॉर्म निवडणुकीच्या रिंगणात आले त्यावेळी तालुक्यातील जनता सुद्धा संभ्रमात पडली होती. मग या ठिकाणी आघाडी धर्म पाळण्यात नेते मंडळींनी मनाची उदारता दाखवली आणि आपले फॉर्म मागे घेतले.त्याच ठिकाणी आदरणीय बाबाजी काळे साहेबांनी अर्धी लढाई जिंकली होती.
सगळा तालुका एकवटला होता.व्यासपीठ नेते मंडळींनी भरलेले दिसत होते. महिला सुद्धा व्यासपीठावरून रणरागिणीच्या स्वरूपात प्रकट झाल्या होत्या.त्याला कारण ही तसेच होते.गोर गरीब महिलांना भारत देशातील देवदर्शन त्यांनी घडवून आणले होते.एक माळकरी विधानसभेचा मानकरी करू या अशी भावना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचली होती.आणि मग आम्हाला आठवू लागले होते सन दोन हजार चार, हे वर्ष ,या वर्षी लोकसभेची निवडणूक लागली होती.या निवडणुकीत एक शेतकऱ्याचा मुलगा,नाविन्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण करणारा आंबेगाव तालुक्यातील सर्व सामान्य माणूस म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील हा तरुण निवडणुकीत उभा राहिला होता.त्यावेळी सुद्धा हा तालुका एकवटला होता.मोठ्या प्रमाणात आघाडी देऊन लोकसभेचा मानकरी त्यांना ठरवले होते तोच तो क्षण पुन्हा एकदा डोळ्या समोर दिसू लागला होता.
प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला होता.ज्या ज्या वेळी बिनबुडाचे आरोप होत होते,त्या त्या वेळी त्यांनी संयम राखला या आरोपाला माझा पांडुरंगच उत्तर देईल अशी भावना त्यांनी मनाशी बाळगली होती.आणि तो दिवस उजाडला ,वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस . त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणता उमेदवार असता तर त्यांनी प्रथम प्रत्येक गावाचा तपशील पाहिला असता ,मतदानाची तयारी कशी आहे? हे समजावून घेतले असते.परंतु यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आळंदीकडे धाव घेतले. आळंदी मध्ये माऊलींच्या समाधी वर आपले भावपूर्ण मस्तक टेकवले, महंतांच्या सानिध्यात अभिषेक केला,माऊलींचे आशीर्वाद घेतले आणि सरळ ते आपल्या धर्म पत्नी सह मतदान करायला गेले.खूप मोठा आत्मविश्र्वास देवाने त्यांच्या पदरी ठेवला होता.एका भेटीत त्यांनी सांगितलं होतं की उमेदवारी देवाने दिलेली आहे तोच सर्व काही ठीक करेल,किती मोठा विश्वास देवावर ठेवला होता.मतदाना नंतर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात धाकधूक होती आमचे उमेदवार निवडून येतील काय? कारण समोरची व्यक्ती अत्यंत अनुभवी आणि तीस वर्षे राजकारणात मुरलेली होती.प्रत्येक गावागावातून रात्री बरेच प्रकार पहावयास मिळत होते.ते सुध्दा निमूटपणे सहन करत मतमोजणीच्या दिवसाची वाट पाहू लागले होते.
तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सूर्य देवाने लख्ख प्रकाश अवघ्या धरणी मातेवर टाकला होता. मत मोजणी चालू झाली पहिल्या फेरी पासून जी आघाडी त्यांनी घेतली ती कायम स्वरुपी शेवटच्या फेरी पर्यंत टिकून ठेवली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.शेवटची फेरी संपली तेव्हा काळे साहेब तब्बल ५१,७४३ मतांनी विजयी झाले होते.तालुक्यातील सर्व माजी आमदारांच्या परिवारांनी दिलेली मदतीची हाक आणि सोबत असलेले सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते यांच्या जीवावर व तालुक्यातील मतदार राजाने दिलेल्या मतांमुळे आदरणीय बाबाजी शेठ काळे विधानसभेत पोहचले होते.आणि आमदार म्हणून सर्व जनता त्यांना शुभेच्छा देण्यात व्यस्त दिसत होती.अशी भावना त्यांचे समर्थक श्री.बाळासाहेब मेदगे यांनी व्यक्त केली
हे पहिले आमदार असे असतील की मतदानाच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर माऊलींच्या चरणी नतमस्तक होत होते.
एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी होणारे हे पहिलेच आमदार असतील.
तालुक्यात मोठ्या मोठ्या दिग्गजांनी उमेदवारी फॉर्म भरले परंतु यांना आमदार बनवण्यासाठी मनाची उदारता दाखवत माघार घेतली.
प्रत्येक सर्व सामान्य माणसाचा कॉल घेणारे हे पहिलेच आमदार असतील.
शेवटी एक माळकरी म्हणून विधानसभेचा मानकरी ठरलेले हे आमदार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
लेखन :बाळासाहेब मेदगे
Discussion about this post