त्याचं झालं असं की, टाकळकर आणि कड कुटुंबीयांच्या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी आमदार बाबाजी काळे निघाले खरे परंतु मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. विवाहाची घटिका समीप आल्याने आमदार काळे यांनी एका दुचाकी स्वराला विनंती केली. आणि विवाहस्थळापर्यंत दुचाकीवरून घाईघाईने प्रवास केला. अखेर वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी केलेली कसरत कामी आली. आमदार बाबाजी काळे वेळेत उपस्थित राहिल्याने वर अभिजित आणि वधू अर्चना यांनी आभार मानले.
Discussion about this post