निवडणूक काळात किंवा त्या अगोदर जो नित्य दिनक्रम होता अगदी तसाच दिनक्रम बाबाजी काळे यांचा राहिला. कोणतेही विशेष काम किंवा निवडणूक काळात दगदग झाली म्हणून आराम केला नाही. इतर दिवशी प्रमाणे आजही सकाळी लवकर झोपेतून उठले, देवपूजा झाल्यानंतर राजगुरुनगर, खरपुडी आणि काळूस या वेगवेगळ्या ठिकाणी दुःखाच्या प्रसंगी अर्थात दशक्रिया विधीला उपस्थित राहिले त्यानंतर पुन्हा घरी आले. घरी असलेल्या कार्यालयात अनेक कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला. दुपारी पुन्हा राजगुरुनगर शहरातील नागरिकांशी संवाद साधला.
रोजच्या दिनक्रमानुसारच आजचा दिवस होता निवडणूक काळात झालेल्या दगदगीचा कोणताही परिणाम त्यांच्या बोलण्यातून अथवा वागण्यातून पाहायला मिळाला नाही. याउलट विजयाची निश्चिती आहे असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवला.
Discussion about this post