इतर कारखान्यापेक्षा अधिकचा भाव देऊ
– व्हा. चेअरमन मोहनराव जगताप.
रिधोरी (प्रतिनिधी) गोपाळ तौर
दि.२४ : माजलगांव तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ चा अकरावा गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी कारखान्याचे चेअरमन बाजीराव जगताप व व्हा.चेअरमन मोहन जगताप तसेच शेतकऱ्यांच्या शुभहस्ते पार पडला.
तसेच छत्रपती साखर कारखाना इतर कारखान्यापेक्षा अधिकचा ऊसाला भाव देणारा आहे तसेच मागील वर्षी पाऊस कमी प्रमानात असल्याने ऊसाची लागण कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे गळापासाठी आणावा असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन मा.आ.बाजीराव (भाऊ ) जगताप यांनी केले.
तसेच कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहन जगताप शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले की, मागील दहा हंगामात कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १२५० मे.टन होती. या हंगामात कारखान्याची क्षमता वाढली असून आता ५००० मे.टन प्रतिदिन झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची कोंडी दूर झाली आहे. तसेच गेल्या दहा हंगामात छत्रपती कारखान्याने इतर कारखान्यापेक्षा जास्त ऊसाला भाव दिला आहे तीच परंपरा या गाळप हंगामात कायम राहील असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नारायण अण्णा डक, भाई गंगाभीषण थावरे, भाई नारायण गोले, नारायण होके,विनायक मुळी, श्रीहरी काळे, महादेव जमाले, अरुनराव इंगळे, प्रशांत मोरे, प्रकाश जेधे, विश्वंभर थावरे, कचरू खळगे, शकीलभाई खुरेशी, कॉम्रेड दत्ता डाके,प्रभाकर नरवडे, युवराज लगड, संतोष यादव, रामराजे रांजवन यांचे सह कारखान्याचे संचालक, ऊस उत्पादक शेतकरी,सभासद ,कारखान्याचे कर्मचारी,ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूक ठेकेदार,पत्रकार ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post