

प्रतिनिधी प्रशांत माने नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरी करणाऱ्या तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरी करणाऱ्या ही इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरातून चोरलेले पैसे तसेच चार मोटार सायकल हस्तगत करत चार गुन्हे उघडते सांगण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले. मागील काही दिवसांपासून नारायणगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मंदिर चोरी त्याचबरोबर मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या,त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुणांचे तात्काळ उकल करण्याबाबत सूचना दिल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी मौजे शिरोली तर्फे आले गावातील मळगंगा माता मंदिर येथून दानपेटी फोडून त्यातील अंदाजे एक हजार रुपये रक्कम चोरून नेल्याबाबत दत्तात्रय बबन डावकर यांनी दिलेला फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. होता.तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेच्या आधारे संशयित इसम संदीप उर्फ भावड्या वाल्मीक पथवे वय वर्ष 30 राहणार वळणवाडी मांजरवाडी तालुका जुन्नर याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेले एक हजार रुपये रोख रक्कम तसेच 86 हजार रुपये किमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत केले.नारायणगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हे उघडके सांगण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महादेव शेलार,उपनिरीक्षक पाटील साहेब, पोलीस कॉन्स्टेबल घोडे मॅडम, गोरक्ष हासे व इतर पोलीस कर्मचारी उत्तम अशी कामगिरी केली.
Discussion about this post