आजरा – तालुका प्रतिनिधी,
चंदगड विधानसभा मतदार संघातील अपक्ष बंडखोर आमदार म्हणून ओळखले जाणारे शिवाजीभाऊ पाटील यांचे स्वागत मा. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करणेत आले.
त्यांची कारकीर्द म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला होता पण अपयश ही यशाची पहीली पायरी आहे असे समजून त्यांनी आमदार नसतानाही कोट्यावधीची विकासाची कामे केली तसेच कोणतेही काम असोत शब्द शिवाजी भाऊ यांना बोलला आणि तो नाही म्हटले असे कधापीही शक्य नाही. हाच पॅटर्न शिवाजीभाऊ यांनी आजपर्यत जोपासला.
आजरामधून मलिग्रे गटातून आजरा आण्णा भाऊ समुहाचे अशोक चराटी यांनी भरगोस मतानी निवडून देणेचे कबुल केली तसेच कैं केदारी रेडेकर यांचे सुपुत्र अनिरुद्ध रेडेकर यांनी पाठींबा दिला तसेच आजरा तालुका भाजप नगरसेवक आनंदा कुंभार, अरुण देसाई, मलिकार्जून बुरुड, सुधिर कुंभार, नाथ देसाई, राजू चंदनवाले, तसेच सर्व मलिग्रे मतदार संघातील सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी भरपूर मताधिक्य देण्याचे काम केले.
यामध्ये मोलाचे कार्य म्हणजे रोहियो राज्य मंत्री मा. भरमू अण्णा पाटील यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे त्याच बरोबर विकासाची कास ही शिवाजीभाऊ यांची साथ चंदगड – आजरा – गडहिंग्लज या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास करणेचे काम त्यांनी केले
चंदगड तालुक्यातील प्रतिमहाबळेश्वर असणारे शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शान पावन झालेले किल्ले पारगड येथील विकास कामाचे आश्वासन दिलेले आहे त्यामध्ये
भवानी मंदिर समोर कटडा बांधकाम, तलावाची दुरुस्ती, बरेच दिवस रेंगाळत असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्याच प्रमाणे पारगड ते तिलारी जोडणारा महामार्ग हे प्रश्न सोडविण्याचे काम तातडीने करणार असलेचे त्यांनी पारगड येथील ग्रामस्थांना सांगितले आहे
Discussion about this post