
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रजत चांदेकर
AFPRO आफ्रो या सामाजिक संस्थे अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेता यांचे प्रशिक्षण संपन्न झाले यात गावांतील ७० कृषी निविष्ठा विक्रेता उपस्थित होते सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेता दिनांक १२/०३/२०२५ ला पंचायत समिती सभागृह राळेगाव येथे कृषी निविष्ठा प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी आडे कृषी विकास अधिकारी जि. प.यवतमाळ तसेच प्रमुख पाहुणे श्री. जोशी साहेब तालुका कृषी अधिकारी राळेगाव, सौ .मनीषा ताई पाटील कृषी अधिकारी प.स.राळेगाव, सौ. भारती इसळ प.समिती राळेगाव, डॉ .प्रमोद मगर सर कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, श्री .शरअली बापु लालानी (सामाजिक कार्यकर्ते) ,श्री .ज्ञानेश्वर बोरकर सर (प्रकल्प व्यवस्थापक नेर )प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .प्रमुख मार्गदर्शन डॉ. प्रमोद मगर सर (कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ) तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री .नंदकिशोर डेहनकर सर (प्रकल्प व्यवस्थापक 05 राळेगाव) यांनी केले त्यांनी प्रकल्पातील तत्व व निकष विषयावर मार्गदर्शन केले डेटा व्यवस्थापन, नसर्गिक संसाधने,पिक संरक्षण,माती ,पाणी,कापूस धा ग्याची गुणवत्ता व्यवस्थापन,चांगले काम,स्त्री -पुरुष समानता ,शास्वत उपजीविका इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तसेच डॉ . प्रमोद मगर सर यांनी कीटकनाशके प्रकार त्यांचे चिन्हे वर्गीकरण वापरण्याची पध्दत तसेच डोज प्रमाण ,कॉकटेल पद्धत व दूष परिणाम ,सुरक्षित साधनांच्या वापर व घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच श्री .जोशी साहेब यांनी शेतकरी यांना कृषी निविष्ठा विक्रेता यांनी योग्य मार्गदर्शन करावे जमिनीची सुपीकता माती आरोग्य व सापळा पीक मिश्र पिक पध्दती पिक नियोजन करण्या विषय मार्गदर्शन केले ,सौ .मनीषा ताई पाटील कृषी अधिकारी प.स.राळेगाव, सौ .भारती मिसाळ प.समिती राळेगाव यांनी मार्गदर्शन केले श्री .शरअली बापू लालानी यांनी सुधारीत आदर्श कापूस प्रकल्प या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले मातीतील गुणधर्म रासायनिक खतांचा व कीटकनाशके याचा कमी वापर करून जैविक पद्धतीचा अवलंब करावा जैविक कंपोस्ट खते इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तर सुत्र संचलन श्री .डी. एम .बावणे(कृषी मित्र)यांनी केले तर,आभार प्रदर्शन श्री .राजकुमार बेताल यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी मित्र श्री .राजु वानखेडे, भगवान डोफे,चिंतामण टेकाम, प्रवीण चिडे,वृषभ दांरुडे, देवेंद्र निकुडे,निखिल इंगोले,रणजित कन्नके,आशिष कावळकर, तृप्ती डंभारे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कृषी निविष्ठा विक्रेता उपस्थित होते.
Discussion about this post