अतिक्रमणास इतर समाजाच्या विरोधात गावात तणाव
तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमूर -चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुण झेंडा उभारला , बुद्ध मूर्ती मांडून कुंपन करण्यात आल्याने इतर समाजाकडून याला विरोध करण्यात येत आहे.ज्यामूळे गावात तणाव निर्माण झाला. असुन २८ नोहेम्बर रोज गुरुवारला पोलिस तथा दंगा नियंत्रण पथकास पाचारण केल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
गदगाव येथील नागरिकांनी 27 नोव्हेंबर ला तहसीलदार श्रीधर राजमाने व पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांना निवेदन सादर केले होते. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता तहसीलदार राजमाने. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी स्वतः गावात भेट दिली. सध्या गावात पोलिस तथा दंगा नियंत्रण पथक तैनात असून गावला छावणीचे स्वरूप आले आहे.
Discussion about this post