गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड :- कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रसिद्धीपासून चार हात दुर समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा सत्यशोधक भाऊसाहेब माने यांचा वारसा डॉ विजयराव माने चालवित आहेत त्यांचे हे कार्य अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांनी व्यक्त केले .
स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे दि 28 नोव्हेंबर रोजी ते सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटनपर भाषणात बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी शास्त्रज्ञ डॉ विजयराव माने हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा, सत्यशोधक संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, माजी आमदार विजयराव खडसे, प्राचार्य डॉ वि ना कदम , अँड अनिल माने,निवृत्त माजी जि.प सदस्य चितांगराव कदम , श्रीराम पाटील नलावडे , माजी जि.प अध्यक्ष रमेश चव्हाण , जिनप्रेस अध्यक्ष शिवाजीराव भा . माने, भाजपा जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर , शंकरराव तालंगकर सतिश नाईक ,श्रीधर देवसरकर , देवानंद मोरे, सौरव सतिश वानखेडे आदि मान्यवर उपस्थित होते .
आमदार वानखेडे यांनी पुढे बोलताना भाऊसाहेब माने यांचा वारसा डॉ .विजय माने चालवितात या कार्यक्रमात त्यांनी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला त्यामुळे चांगले कार्य करणाऱ्यांना या कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळते असे म्हणाले .तसेच भाजपा जिल्हा समन्वय नितीन भुतडा यांनीही बोलताना या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यस्तरावर हा कार्यक्रम घेऊन समाजातील चांगले कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल याकरिता आम्ही सर्वतोपरी हातभार लावू असे उद्गार काढले .
याप्रसंगी माजी आमदार विजय खडसे, प्रा डॉ वि ना कदम यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच
डॉ विजय माने यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी लाडक्या बहिणीला न्याय दिला असे सांगून महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिली .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर संचलन आनंद देशमुख व आभार सुनील वानखेडे यांनी केले .
चौकट: महात्मा फुले आणि महात्मा गांधी या दोन्हीही महात्म्यांनी सत्याचा शोध घेऊन व सत्याचे प्रयोग करून जगाला माणुसकी नावाचा सत्यधर्म दिला.
डॉ. विजय माने
अध्यक्ष: सत्यशोधक शेतकरी संघ.
चौकट ।

गौरविण्यात आलेले पुरस्कारार्थी
स्व जेठमलजी माहेश्वरी व स्व बंकटलाल भुतडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार म्हणून निळकंठ धोबे यांना तर स्व नारायणराव शिलार व स्व नारायण वानखेडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ उत्कृष्ठ शैक्षणिक प्रशासनाबद्दल पं. स चे विद्यमान गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांना ,स्व रामचंद्र शिंगणकर व मरहुम हाजी अमानुल्ला जागीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिला सशक्तिकरणाच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल माधुरी दळवी यांना, स्व वामनराव उत्तरवार व स्व . गुलाबसिंग ठाकूर यांच्या स्मृतिपित्यर्थ दिव्यांग उद्योजक आनंद पतंगे यांना ,स्व सखाराम नरवाडे गुरुजी व स्व सखाराम मुडे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
सामाजिक क्षेत्रातील आदर्श बहुउद्देशीय संस्था उमरखेड यांना, स्व भाई केशवराव देवसरकर व स्वर्गीय परसराम पिलवंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक वनीकरण अभियान राबविणारे अशोक शिरफुले यांना स्वर्गीय विठ्ठलराव देशमुख सवनेकर व स्व देवराव पाटील चोंढीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक म्हणून प्रल्हाद मिराशे यांना, कृ रा . देशपांडे गुरुजी व स्व भास्करअण्णा गोविंदवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्यिक पुरस्कार म्हणून प्राध्यापक अभय जोशी तर स्व गुणवंतराव देशमुख व पंजाबराव भाऊसाहेब माने यांच्या स्मृति प्रित्यर्थ कृषी क्षेत्रात उत्कृष्ठ कार्या बाबत सोमनाथ जाधव सह या नऊ पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले
Discussion about this post