सोयगाव
जरंडी येथुन काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू,तांदूळ व सकस आहारची वाहतूक करतांना मारूती व्हॅन व तीन मोटार सायकल ग्रामस्थांनी पकडून पोलिसात जमा केल्याची घटना शुक्रवारी (दी.२९) सकाळीं घडला.या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी सोयगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे हे धान्य रेशनचे असण्याबाबत स्पष्ट अहवाल मागविला आहे.त्यानंतरच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता जरंडी येथून शासनाचा स्वस्त धान्य असलेले गहू तांदूळ,ज्वारी व अंगणवाडीच्या बालकांना दिला जाणारा सकस आहाराच्या गोण्यानी भरलेली मारुती ओम्नी (क्रमांक एम एच २०, व्ही ६२८८) जात असताना ग्रामस्थांना आढळून आली. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने शेकडो ग्रामस्थ वाहनाला आडवे झाले होते. यावेळी गाव पंचांनी संबंधितांकडे विचार पुस केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सोयगाव तहसील कार्यालय व पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.
यातील संशयित अल्पसंख्याक समाजातील पाच जन असून त्यात शिवणा येथील चार व निंबा यती येथील दोधे असल्याचे समजते.
पुरवठा विभागाची टाळाटाळ :-
सोयगाव तहसीलदार मनीषा मेने यांना ग्रामस्थांनी फोनवरून या प्रकाराची माहिती दिली असता त्यांनी आपण मीटिंगला आहोत.तुम्ही पुरवठा अधिकारी काकासाहेब सावळे यांना संपर्क करा अश्या म्हणाल्या. तदनंतर पुरवठा अधिकारी सावळे यांच्याशी संपर्क केला असता आमचीही संभाजीनगर येथे दुपारी ३ वाजेला मीटिंग असून गोदामरक्षकसह निघालो आहे.आता आम्ही सिल्लोड मधे आल्याचे तिकडे येणे शक्य नसल्याने तुम्ही सोयगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला.शासनाच्या पुरवठा विभाग व पोलीस यंत्रणेला या बाबत माहिती सकाळी ९ वाजेला देऊनही जवळपास चार ते पाच तास एकही विभागाचा एकही कर्मचारी जरंडी येथे फिरकला नाही.
दरम्यान ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयास पकडलेल्या धान्याचा व वाहनाचा पंचनामा करण्याचा आग्रह केल्याने पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात मारुती ओम्नी (एम एच ४३ व्ही ६२८८) व त्यातील तांदळाच्या सात गोण्या,गहू २ गोणी,ज्वारी १ गोणी,सोयाबीन १ गोणी तसेच अंगणवाडी साठी असलेल्या सकस आहाराच्या पाकीटे भरलेल्या २ गोणी असा अंदाजे १० क्विंटल माल आढळून आला.त्यासोबत मोटार सायकल प्लेटीना (एम एच २०बी व्ही ००८७), मोटार सायकल डीस्कव्हर ( एम एच २० ए यु ९६७९) व मोटार सायकल हिरो होंडा (एम एच ए यू ९४३२) यांचाही पंचनामा करण्यात आला आहे.
पोलिसांचा हल गर्जीपणा :-
वेळोवेळी फोन केल्यानंतर उशिरा सहा तासांनी पोलिस पोहचले.सर्व काही आलबेल असल्याचे दाखवत याबाबत आम्हाला पंचनामा किंवा गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगून हे काम पुरवठा विभागाचे आसल्याचे सांगितले.दरम्यान ग्रामस्थांतून रोष निर्माण झाल्याने वाहन पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यास तयार झाले.
या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी सोयगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे हे धान्य रेशनचे असण्याबाबत स्पष्ट अहवाल मागविला आहे.यातील पाच ते सहा इसमा विरुद्ध पोलिस काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
फोटो ओळ :- सोयगाव – जरंडी ग्रामस्थांनी पकडलेली काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा गहू तांदूळ व सकस आहाराने भरलेली मारुती ओम्नी गा
Discussion about this post