तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमूर :- संविधान सन्मान समारोह समिती नेरी च्या वतिने बाजार चौक नेरीच्या व्यासपीठावर संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन संविधान सन्मान समारोह समितीचे सदस्य विना राऊत, रत्नमाला सहारे, जॅनी पोपटे, निशा डांगे, हेमलता नागदेवते, किरण फुलझेले, स्नेहदिप खोब्रागडे, नाजुका इन्दोरकर, विकेश जनबंधु व सरीता जनबंधु यांनी केले होते. प्रमुख पाहुणे मा. विनोदजी लांडगे तळोधी (बा.), समतादुत प्रज्ञा राजुरवाडे मॅडम व सिरी निलकंठ शेंडे चिमुर, नेरी ग्रा.प. चे उपसरपंच चंद्रभान कामडी हे होते.
प्रमुख पाहुण्यांनी संविधान कोनासाठी यावर भाषणे दिली . संचालन पद्मा नागदेवते प्रास्ताविक ज्ञानेश्वर नागदेवते तर आभार रोशन गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संखेने बौध्द उपासक व उपासीका आणि ग्रामस्थ उपस्थित होते .
Discussion about this post