अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला: वाइन मार्ट फोडून ६७ हजारचा मुद्देमाल लंपास
मूर्तिजापूर स्टेशन विभागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नेभनाणी कॉम्प्लेक्समधील महाजन वाइन मार्टचे शटर तोडून अज्ञात भामट्याने मद्य व ४० हजार रोख, असा ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून पसार झाल्याची घटना घडली. महाजन वाइन मार्टचे मालक अमन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे महाजन वाइन मार्ट हे मद्य विक्रीचे दुकान येथील स्टेशान विभागातील नेभनाणी कॉम्प्लेक्समध्ये आहे. त्यांच्या बाजूचे दुकान मालक दीपक चंदावाणी यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तुटलेले असल्याबाबत त्यांना माहिती दिली.
Discussion about this post