अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे सहकार विभागाच्या पथकाने अकोला शहरात तीन ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले असून अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे जप्त केली आहेत. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ मधील तरतुदीनुसार अकोला शहरातील सुधीर कॉलनी, जठारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर या तीन ठिकाणी तीन पथकाव्दारे शोध मोहीम करण्यात आली. सावकाराकडून दस्तऐवज जप्त करण्यात आले. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली
Discussion about this post