नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा. या प्रकरणी कोल्ड स्टोरेजचे मालक पंडित पूरण जोशी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सध्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गोमांस शोध मोहीम अंतर्गत निदर्शनास आले कि, सुमारे 10,000 गायी मारल्या गेल्या असाव्यात.
दादरी येथे ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 कोटींहून अधिक किमतीचे 185 टन प्रतिबंधित मांस जप्त केल्याप्रकरणी अक्षय सक्सेना, शिव शंकर आणि सचिन यांच्यासह कोल्ड स्टोरेजचे मालक पंडित पूरण जोशी यांनाही अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ह्यात एकही मुस्लिम नाही आणि 10,000 गायी हा आकडा म्हणजे गंमत नाही. हिंदू धर्माचा मुखवटा घालून समाजात फिरणारे हे तथाकथित हिंदू लोक गोहत्येला विरोध करत फिरतात. आणि मॉब ब्लिचिंग करताना दिसतात. या प्रकरणात, स्टोरेजचा मालक मुस्लिम असता तर ही बातमी आपल्या देशातील प्रत्येक टीव्ही चॅनेलवर आली असती आणि सर्वत्र निषेधाचे पोस्टर लावले गेले असते. आणि तो संसदेत चर्चेचा विषय झाला असता…
Discussion about this post