सोयगाव
ग्रामीण रुग्णालय सोयगाव व जिल्हा
छ.सभाजीनगर च्या जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे, जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार ,वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शाना खाली मंगळवारी सोयगाव येथील आठवडे बाजारात जागतिक एड्स दिवस बाबत संवेदिकरन आणि जनजागृति व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी समुपदेशक सुनील वानखेडे समुपदेश अतुल मुळे,गणेश भोटकर, भूषण चव्हाण यांनी पोस्टरचे प्रदर्शन केले. या आजरा संदर्भात तरुण मुले रिक्षा चालक यांना समुपदेशक सुनील वानखेडे यांनी माहिती दिली, त्याचप्रमाणे सरकारी दवाखान्यात आय सी टी सी. विभागात मोफत एच आय व्ही तपासणी केल्या जाते व या आजरा संदर्भात मोफत सल्ला दिला जात आल्याचे सांगितले. लोकांनी आपली स्वतःची एच आय व्हीं तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
फोटो ओळ :- सोयगाव – सोयगाव आठवडे बाजारात एडस् जनजागृती बाबत पोस्टरचे प्रदर्शन करतांना समुपदेशक सुनील वानखेडे समुपदेश अतुल मुळे,गणेश भोटकर, भूषण चव्हाण व ईत
Discussion about this post