सिद्धार्थ कदम
तालूका प्रतिनिधी
पुसद: दि 2 डिसेंबर सन2023-2024 शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर येथील विधी 3 आणि 5 वर्ष एल.एल.बी. विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात न घेता अपात्र करून सेमिस्टर परीक्षा व प्रवेशा पासून वंचित ठेवल्यामुळे “भारतीय विद्यार्थी मोर्चा” तर्फे एकाचं वेळी महाराष्ट्रातील 36 जिल्हयांमध्ये निवेदने देण्यात आली.
त्याचाचं एक भाग म्हणून उपविभागीय अधिकारी, पुसद यांना सुध्दा निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जयशील कांबळे, बंडू गंगावणे, समाधान पंडागळे, अॅड. सैफअली शेख, विकास गडधने, यश पडघने, रोहित कांबळे, सुरज भडंगे, आशिष खडसे आणि इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या समस्येचं वेळेवर समाधान न केल्यास येत्या काळात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या राज्यव्यापी आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा यांनी केले.

Discussion about this post