प्रतिनिधी: गुरुनाथ नेमाणे
लोणावळा.-दि. ३/१२/२०२४ रोजी लोणावळा येथील संवाद शाळेत लोणावळ्याच्या इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड च्या वतीने विशेष मुलांसाठी शैक्षणिक वस्तू व चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच तेथील स्टाफ यांना हाथरुमाल व गोड देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले त्याच बरोबर त्यांच्या सोबत स्काऊट च्या काही ऍक्टिव्हिटी करण्यात आले…
या वेळी गिल्ड च्या अध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच सुनील शिंदे यांनी आभार मानले तसेच शैक्षणिक वस्तू चे स्पॉन्सर डॉ कालेकर यांचेही आभार मानले.
या वेळी लोणावळा गिल्ड च्या अध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड,उपाध्यक्ष सायली जोशी,सचिव हेमलता शर्मा, सुलभा खिरे, सुनिल शिंदे,श्रावणी कामत, पूर्वा गायकवाड, अंबिका गायकवाड, दामले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post