गावातील नागरिकांच्या जीवाशी विजेच्या माध्यमातून खेळ खेळण्याचा प्रयत्न
तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
भिसी:- भिसी येथिल प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवासी सौ. शिल्पा अजय शिवरकर ह्या आपल्या घरासमोर असलेल्या नगरपंचायत च्या बोरिंगवर पाणी भरण्याकरिता गेल्या असता त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला परंतू म्हणतात ना llदेव तारी त्याला कोण मारीll त्याप्रमाणे परिसरात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेला तात्काळ डॉ. गायकवाड यांच्या रुख्मिणी हॉस्पिटल मध्ये दाखल करून औषधोपचार सुरू केला व सदर महिलेचा जीव थोडक्यात बचावला.
विशेष असे की सदर महिलेला सहा महिन्याचे छोटेसे बाळ आहे.
भिसी नगरपंचायत स्थापनेपासून आजतागायात भिसी येथे प्रशासक कारभार चालू आहे या प्रशासकराजमध्ये इथे जे नियुक्त प्रमुख कर्मचारी आहेत ते कर्मचारी चिमूर येथून भिसी नगरपंचायत चां कारभार हाकत आहेत. त्यामुळे यांचे या गावात तसेच नगरपंचायत मध्ये येणे हे पाहुण्यांसारखे झालेले आहे त्यामुळे इथल्या स्थानिक कर्मचाऱ्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येने व क्षेत्रफळाने विस्तीर्ण नगरपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांनी स्थायी राहायला पाहिजे परंतु राहत नसून इथला कारभार चिमुर वरूनच हाकत आहेत.या नादुरुस्त टाकी व बोरिंग बाबतीत प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी मागील चार महिन्यापासून अनेकदा नगरपंचायतला सूचना केलेल्या आहेत की आमच्या प्रभागात असलेली टाकी व त्याकरिता उभे केलेले शेड हे जीर्ण झालेले आहे परंतु कोणीही वाली नसल्यासारखे त्यांच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही आज बुधवार ला तर चक्क असा प्रकार घडला की पाणी भरायला गेलेली सौ शिल्पा जय शिवकर ही महिला विजेचा शॉक लागून खाली नालीमध्ये पडली नशीब बलवत्तर म्हणून सदर महिला नागरिकांच्या सतर्कतेने थोडक्यात बचावली.
जेव्हा त्या महिलेला विजेता शॉक लागला तेव्हा त्या बोरिंग ची पाहणी केली असता त्या ठिकाणी विजेचा पुरवठा हा डायरेक्ट केलेला आहे. तसेच गावातील अनेक बोरवेल वरती हीच परिस्थिती असल्याचे लक्षात येते तसेच त्या ठिकाणी असलेले सर्व साहित्य जीर्ण झालेले असून त्याची रिपेरिंग सुद्धा केलेली नाही. तशीच तेथील टाकी मागील बरेच दिवसापासून बाजूला काढून ठेवलेली आहे म्हणून नागरिकांना वारंवार इलेक्ट्रिक बटन दाबावी लागते.
परिसरात अनेक लहान लहान मुलं त्या बोरिंग जवळ खेळत असतात चुकून समजा एखाद्या वेळेस असाच विद्युत पुरवठा सुरू राहीला आणि एखाद्याला जीव गेला तर याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन घेणार का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलेला आहे. विजेचा शॉक लागल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाला फोन केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी मोटरपंप सुरू करण्याकरिता लाकडाच्या काडीने बटन उचलत जा व सुरु करत चला अशी अफलातून आयडिया दिली.
आता तरी नगरपंचायत प्रशासन या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देऊन गावातील नादुरुस्त टाक्या दुरुस्त करावी अशी मागणी गावातून होत आहे.
Discussion about this post