भाजपाला राज्यात मिळालेल्या उत्तुंग यशा निमित्त घेतली भेट
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा:– महायुतीला राज्यातील जनतेने यावेळी खोट्या अपप्रचाराला बळी न पडता भरभरून मताचे दान देऊन प्रचंड संख्येत विधानसभेत आमदार निवडून दिल्याबद्दल महायुतीचे महत्त्वाचे घटक पक्ष भारतीय जनता पक्षाचे नेते वर्तमान काळजीवाहू सरकारमधील उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर पोहरादेवीचे संत आमदार बाबूसिंग महाराज यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीच्या मागील आठवड्यात लागलेल्या निकालात भारतीय जनता पक्ष, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांना न भूतो न भविष्यती यश यावेळी प्राप्त झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते ना.देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे धोरण राज्यातील जनतेला भावल्यामुळे कुठलेही अपप्रचाराला यावेळी राज्यातील जनता भुलली नसल्याने १३२ उमेदवार यावेळी ना.फडणवीस यांच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आ. बाबूसिंग महाराज यांच्या समवेत अध्यात्म क्षेत्रातील इतरही माननीय व्यक्तीने महायुतीला या निवडणुकीत यश मिळावे यासाठी परिश्रम घेतले आहे याबद्दल ना.देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांचे आभार मानले.
भारतीय जनता पक्षाला राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये प्राप्त घवघवीत यश पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजूट व मेहनतीमुळे मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या यशाची पुनरावृत्ती होऊन राज्याला विकासाच्या महामार्गावर ना.देवेंद्र फडणवीस घेऊन जातील असा आशावाद विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराजांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.
Discussion about this post