ग्रामीण रुग्णालयाचा सहभाग
मंगरूळपीर: स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालया कडून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय मंगळूरूपीर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दि.२ डिसेंबर ०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे रेड रिबन क्लब ची स्थापना हा कार्यक्रम घेण्यात आला. पोस्टर मेकिंग स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,जनजागृती रॅली असे विविध उपक्रम राबवण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यां तर्फे एच.आय.व्ही./ एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.मंगरूळपीर शहरातून एड्स संदर्भात जागृती करण्यात आली. एक वचनी -एक पत्नी अशा प्रकारचे नारे देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जाधव होते. हा कार्यक्रममहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले यांच्या मार्गदर्शन घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शकआर.व्ही.आडे हे होते. एच.आय.व्ही प्रतिबंध व जनजागृती उपक्रम राबविण्याबाबतविद्यार्थी- विद्यार्थिनी पर्यंत एच.आय.व्ही./एड्स विषयी जनजागृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.या संदर्भात मार्गदर्शन करताना मार्गदर्शक तथा समुपदेशक आर.व्ही.आडे यांनी एच.आय.व्ही.होण्याची कारणेव त्याचे परिणाम आणि युवक- युतीमध्ये एच.आय.व्ही. चा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे युवकांची ऊर्जा,उत्साह आणि धोका पत्करण्याची त्यांची तयारी त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते.त्यामुळे त्यांच्यामध्ये जागृती करणे आवश्यक आहे.असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जाधव, .आर.व्ही.आडे, देवेंद्र परदेशी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.तायडे यांनी केले. या कार्यक्रमालारासेयोचे ५० मुली ४० मुले असे एकूण ९० स्वयंसेवक उपस्थित होते. त्यानंतर मुलांनाअल्पोहार देण्यात आला.फोटो—

Discussion about this post