मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे : तालुक्यातील आसोला खुर्द येथील महिला इंदुबाई रंगराव राठोड ही दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शेतात काम करत असताना रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झाली असुन तिचा हात मोडला आहे. वन विभागाने जखमी महिलेला आर्थिक मदत देण्याची मागणी पिडीत महिलेच्या कुटुंबाकडून होत आहे. इंदुबाई ही महीला बुधवारी सकाळी आसोला खुर्द शेतशिवारात भावाच्या शेतात कापूस येचणीसाठी गेली होती. कापूस येचत असताना शेतात रानडुकरांचा कळप सुसाट अंगावर येत होता. या तावडीतून वाचण्यासाठी जिकडे तिकडे पळत येत असताना डुकर अंगावर आला असताना हातावर महीला पडली. पिडीत महिलेला हात मोडला असुन शेतातून भावाने मोटर सायकलने आणून सामान्य ग्रामीण रुग्णालयात उपचार केला आहे. वन विभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबियांकडून होत आहे.
Discussion about this post