संजय फलके,शिरूर तालुका प्रतिनिधी .
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी विद्या सहकारी बँकेचे संचालक , महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ ,तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी जवळपास १३५ प्रकल्पांचे सादरीकरण केले. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो तसेच विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध कुतुहलजनक प्रयोगांचे ज्ञान व्हावे यासाठी प्रशालेने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या विज्ञान प्रदर्शनात सोलर सिस्टिम, मॉस्किटो रिप्लेंट मशीन, स्मार्ट सिटी ,प्रदूषण नियंत्रण स्मार्ट कार् इत्यादी विविध विषयांना अनुसरून प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता.
या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषय प्रमुख अर्चना गोरे यांनी केले ,वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन सोनाली शेळके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सरला ढमढेरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपशिक्षिका सुमन जंगम, रवींद्र सातपुते, सुरेंद्र ठुबे ,अरुण भगत व जाधव सर यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post