आज दिनांक 05 12 2014 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले होते हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबवण्यात येत असून छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण मॅम यांच्या सूचनेप्रमाणे आज प्रशिक्षण देण्यात आले असून, स्वतः शिक्षणाधिकारी मॅम, डॉ सोज्वळ जैन (सहाय्यक प्रकल्प अधिकारी) , कैलास व्यवहारे (शिक्षण विस्तार अधिकारी) व रामनाथ थोर (महानगरपालिका शिक्षण विस्तार) उपस्थित होते .या प्रशिक्षणाचा शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी मॅम यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post