







अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक पुढारी तर्फ आयोजित करण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना मा. महामहीम राष्ट्रपती,भारत सरकार, दिल्ली यांनी दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी या विद्यार्थ्यांना भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भिलमाळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील कु. अमोल संतोष गोहिरे , इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांची निवड झाली असून देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मु यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाल्यामुळे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. मुकुंदा गायकवाड , वर्ग शिक्षक श्रीम.असलकर मॅडम , अधीक्षक श्री. खंडाळकर सर , अधीक्षिका श्रीम. डांगे मॅडम,शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी यांनी जोरदार स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या वतीने दैनिक पुढारी, अप्पर आयुक्त संदिप गोलाईत, अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग, नाशिक तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण ( भा.प्र.से.) यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकुंदा गायकवाड सर, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले प्रतिनिधी प्रभाकर गारे त्रंबकेश्वर..
Discussion about this post