
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
📲9423170716
गडचिरोली,,
दि 06 जिल्हा मुख्यालपालगत घनदाट जंगल असून या जंगलात वाघाचा वावर आहे. मागिल वर्षी परीसरात वाघाणे धुमाकूळ मजावत अनेक मनुष्य बळी घेतला. त्यातून सुटका होत नाही,तोवर आता पुन्हा जिल्हा मुख्यालयापासून 15 अंतरावर असलेल्या चातगाव बिटमधे वाघांचे हल्ला करून महीलेस ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुपारच्या सुमारास उघडकीस आली सदर महिला गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा परीसरातील जनतेसाठी वाघाच्या हल्ल्यात आहेत. (शारदा महेश मानकर,,वय 25,, या रा कुरखेडा,, चातगाव) असे मृतक महीलेचे नावं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शारदा मानकर ही चातगाव बिटातील जंगलाला लागुन असलेल्या शेतामध्ये नेहमी प्रमाणे कामे करण्यासाठी, गेली होती. दरम्यान परीसरात वाघाणे वावर घातला आहे.शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने शारदावर हल्ला केला. व नरडीचा घोट घेतला, आणि महीलेस ठार मारुन टाकले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक महीलेस एक चिमुकला असुन तिच्या अशा मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.
दरम्यान सदर घटनेची परीसरात दहशत पसरली आहे मृतक महिलेच्या कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच वाघाचा सुद्धा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून नागरिक स्वस्त राहतील अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️📲9423170716..
Discussion about this post