आजरा: आजरा येथील कुमारी ऋतुजा सुनिल तेऊरवाडकर हिचा महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कॅनॉल इन्स्पेक्टर पदी तसेच पुणे जिल्हा न्यायालयात लिपीक पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमंत गंगामाई वाचनालयात एक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत, उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, सौ. रंजना तेऊरवाडकर, बाळकृष्ण दरी, महादेव गवंडळकर, प्रसाद तिप्पट, बाळासाहेब कांबळे, कार्तिक गुरव, मधुरा पंडीत, निखिल कळेकर, महादेव पाटील व गवंडळकर उपस्थित होते.
Discussion about this post