सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमधील बहुचर्चित स्वच्छता कर्मचारी आणि निरीक्षकांच्या अखेर बदल्या झाल्या गेल्या काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी तीनही शहरच्या प्रभावी स्वच्छतेविषयी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूतोवाच केले होते. तब्बल १२०० स्वच्छता कर्मचारी आणि निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे रस्ते आणि गटारीच्या प्रभावी साफसफाई साठी एक आराखडाही तयार करण्यात आला असून आता प्रत्येक एक किलोमीटर रस्त्याच्या सफाई साठी एक महिला स्वच्छता कर्मचारी आणि प्रत्येक पाचशे मीटर गटारीच्या सफाई साठी एक पुरुष स्वच्छता कर्मचारी अशी नेमणूक करण्यात येईल गेले अनेक दिवस रस्ते आणि गटारीच्या स्वच्छते साठी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येत होती तक्रारीही होत्या. आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तीनही शहरांची स्वच्छता हा केंद्रबिंदू ठरवून आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आराखडा तयार झाला असून सध्या महापालिकेत बाराशे स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. कामही व्हावे आणि कर्मचाऱ्यांना गैरसोय ठरू नये अशा पद्धतीने त्यांच्या नजीकच्या प्रभागामध्ये बदली केली आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठून आहेत. आता स्वच्छता कर्मचारी निरीक्षक घंटा गाडी औषध फवारणी आदी सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे
Discussion about this post