विष प्राशनाने संपवली जीवनयात्रा, शेळी परिसरात हळहळ
राळेगाव तालुक्यातील शेळी येथील २3 वर्षीय युवा शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शेळी येथे (दि.9 डिसें.) घडली.मनमिळावू स्वभावाचा युवक म्हणून तो परिसरात ओळखला जात होता. शेळी गावात ही बातमी समजताच अनेकांना धक्का बसला. त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
कापसाला भाव मिळत नसल्याने व कर्जाच्या चिंतेने तो अस्वस्थ होता, यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे ही घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी घडली. शेळी येथील मृतक अमृत हरिदास आडे, वय 23 वर्षे याच्याजवळ वडीलांचे नावे साडेतीन एकर शेती आहे.यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. यंदा त्या शेतात कापसाचा पेरा केला. नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने तो चिंतेत होता.
उत्पन्नातून कर्ज देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह कुटुंबीयांची जबाबदारी पूर्ण होईल, अशी त्याला आशा होती.मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पिकाला जबर फटका बसला. त्यात कापसाचे उत्पन्न न आल्याने शेतकरी खचून गेला. आपल्यावर अवलंबून असलेले आई, वडील, भाऊ, त्यात यवतमाळ जिल्हा बँकेचे 62000 हजार थकीत कर्ज असलेले पीक कर्ज इतर खाजगी कर्जाच्या चिंतेमुळे अमृतने आपल्या राहत्या घरी घरचे शेतात गेल्याचे पाहून दुपारी विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवली. त्याच्या मागे आई-वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे.त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली.
Discussion about this post