
परभणी…
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रकृतीला एका माथेफिरुने दगड मारून काच फोडला ही घटना मंगळवारी 10 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार च्या सुमारास घडली या घटनेनंतर परभणी शहरात तीव्र पडसाद उमटून तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त आंबेडकर अनुयायींनी रास्ता रोको करून संबंधित माथेफिरुवर कारवाईची मागणी केली काही काळ रास्ता रोको केला तसेच परभणी रेल्वे स्थानकावर नंदिग्राम एक्सप्रेस समोर आंदोलन केले सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णा कृती पुतळा आहे. पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्समध्ये संविधानाची प्रतिकृती आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास एका माथेफिरुने प्रतिकृती वर दगड मारला त्यामुळे विटंबना झाली. या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी पुतळा परिसरात जमा झाले. माथेफिरूवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू करण्यात आले. पोलीस प्रशासनाला माहिती समजात मोठ्या संख्येने पोलीस पुतळा परिसरात आले. यावेळी दगडफेकीची घटना देखील झाली. एक ट्रक आणि महामंडळाच्या बसवर दगड फेकून काच फोडण्यात आले. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस थांबवत आंदोलन सुरू करण्यात आले. शहरातील वसमत रोड जिंतूर रोड उड्डाणपूल आदी भागातही दुकानावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या भागात बंदोबस्त तैनात केला आहे.
त्यामुळे सध्या शहरात शांततेचे वातावरण आहेत विटंबना करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विटंबना करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
परभणी शहरात घडलेल्या घटनेनंतर दगड मारणाऱ्या माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करत शहरात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी दगडफेक झाली.
आज आंबेडकरी संघटनाचा बंद.
संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने बुधवार 11 डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. रास्ता रोको केल्यानंतर बंदचे आवाहन करण्याचे आवाहन विजय वाकोडे. रवी सोनकांबळे. आकाश लहाने. रंजीत मकरंद. धम्मदीप रोडे. सिद्धार्थ भराडे. गौतम भराडे. प्रदीप वाकळे. संजय बगाटे. संदीप खाडे. सुनिता साळवे. प्रमोद कुटे. आदींनी केले आहे.
आरोपीला अटक केली शांतता पाळा विजय वाकोडे…
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी 11 डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येत आहे या घटनेमागे कोणते षडयंत्र आहे. याचा शोध घेण्याची मागणीसाठी हा बंद पुकारला आहे. दरम्यान घटनास्थळी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे. यांनी भेट देऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून परिसराची पाहणी केली आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका न घेता बंद शांततेत पार पाळावा असे आवाहन लोकनेते विजय वाकोडे यांनी केले आहे.
आंबेडकरी जनतेने शांतता पाळावी यशवंत काळे.
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली आहे. त्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील जनतेने जिल्ह्यात शांतता राखावी व संयम पाळावा असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
परभणी नगरी न्युज…
Discussion about this post