त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली,मात्र देशाचा मुलनिवासी म्हणून आदिवासी समाजाकडे बघितले जाते, परंतु आजही पाहिजे तितका आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही, शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, अशा मुलभूत सोयीसुविधा आजही ह्या समाजापासून कोसो दूर आहे, म्हणून आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आदिवासी सामाजिक जेष्ठ नेते भगवान मधे यांनी एल्गार कष्टकरी संघटना स्थापन करून आदिवासी व इतर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा देतात,(१०) डिसेंबर रोजी संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला,
या कार्यक्रमामध्ये रेशनकार्ड वाटप करण्यात आले,मधे यांना आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन खोसकर,घोटी पोलिस निरीक्षक विनोद पाटील,डाॅ.महेंद्र शिरसाठ,कार्याध्यक्ष संतू ठोंबरे, खजिनदार सुरेखा मधे, तानाजी कुंदे,भिमा गुंबाडे,काळु भस्मे,गणपत गावंडा, भागिरथ फसाळे, मोहन शेवरे,काळु निरगुडे, शांताराम पादिर, मथुरा भगत,आदि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post