उमेश् धुमाळ प्रतिनिधि
निवडणूक आयोगाला चॅलेंज करणाऱ्या मारकडवाडीत नेत्यांची एंट्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या दि. ८ रोजी मारकडवाडी येथे येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार हे हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे येणार आहेत. ईव्हीएम विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत.
माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा शपथविधी देखील रविवारीच होणार होता. मात्र, त्यांनी आता अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे
Discussion about this post