तालुका प्रतिनिधी समीर बल्की :- चिमुर तालुक्यातील भिसी येथे नविन उपक्रम राबवले झाडे लावा झाडे जगवा.
तालुका प्रतिनिधी समीर बल्की :- चिमुर तालुक्यातील भिसी येथे नविन उपक्रम राबवले झाडे लावा झाडे जगवा समाज कार्याची ओढ आणि निसर्ग संवर्धनाच्या जाणीवेतून प्रेरीत झालेल्या एका महावितरण अभियंत्याने स्व: खर्चातून तीनशे च्या वर झाडे लावली, त्या अभियांत्या चे नाव श्री. कृपाल महादेव लंजे असून तो विज वितरण केंद्र भिसी, महावितरण येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे.
आपण दैनंदिन जीवनात बघतो की प्रत्येक जण स्वतःसाठी जगण्यात व्यस्त आहेत, अशा परिस्थितीत कुणाला तरी निसर्गाची आणि एकंदरीत मानवी आयुष्यात झाडांची माहीती लक्ष्यात यावी व कुठलाही स्वार्थ न ठेवता ,आपल्या महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने मिळेल त्या ठिकाणी जसे भिसी बस स्थानक, उमरेड -चिमूर महामार्ग, ३३/११ के. व्ही. उपकेंद्र भिसी, तसेच भीसी मधील काही ठरावीक शाळांमध्ये वृक्षारोपण करून, समाजातील इतर लोकांना वृक्ष लागवड व संगोपन ही काळाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी अग्रगण्य भुमिका बजावली. त्यांची मुलाखत घेतली असता,
त्यांच्यामते १५ ऑगस्ट रोजी आपण इंग्रजांविरुद्ध लढा देऊन त्यांच्या जुलमी शासना पासून मुक्त झालो असलो तरी आता जगात CO,CO2, O3, NO,NO2 असे अनेक विषारी वायूंचे प्रमाण वाढलेले आहेत,जे जागतिक तापमान वाढीत मुख्य भूमिका बजावत आहेत, करीता यांपासून मुक्त होने काळाची गरज आहे व त्यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा आहे.
या माध्यमातून त्यांनी समस्त जनतेला तसेच आपल्या महावितरण कर्मचाऱ्यांना आवाहन केले की प्रत्येकानी किमान एक झाड स्वतःसाठी व निसर्गासाठी लावावे, कारण निसर्ग कुठलाही हेवा दावा न करता आपल्याला भर भरून देत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा निसर्गाचं काही देणे लागत असते. या वृक्ष लागवडी उपक्रमात भिसी वीज वितरण केंद्रातील समस्त कर्मचारी व मेंटेनन्स कामगार उपास्थित होते.



Discussion about this post