रविकिरण खिचडे
लातूर तालुका प्रतिनिधी
लातूर प्रतिनिधी – 10/12/24 लातूर येथील आलमला बचत गट हा सामाजिक उपक्रम राबवून व आर्थिक विकास करत संघटितपणे एकत्र अखंडपणे पुढे जात आहे असे मत माणूस प्रतिष्ठान चे अध्यक्ष व माझं घर सेवा प्रकल्पाचे संचालक मा. श्री शरद झरे यांनी केले. आलमला बचत गटाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन श्री शरद झरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आलमला गावचे सरपंच श्री विकास वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे उपसरपंच श्री इरफान मुलानी जलतज्ञ श्री राजेंद्र सर व गटाच्या अध्यक्षा सौ. संगीता बेरकीले उपस्थित होत्या. लातूर येथे आयोजित कार्यक्रमात आलमला बचत गटाच्या वतीने वर्ष 2025 साठी काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यातआले. लातूरमध्ये राहणाऱ्या सर्व गावातील तरुण व्यावसायिकांना व महिलांना एकत्र येऊन बचत गटाची स्थापना केली हा उपक्रम स्तुत्य आहे गावच्या एकीचे दर्शन होते यातून एकमेकांच्या गरजही भागतात व सामाजिक व आर्थिक विकास होतो यावेळी बचत गटाच्या दिनदर्शिका व प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांनी जाहिरात देऊन सहकार्य केले श्री मोहन समशेट्टे, सोमेश्वर पाटील शिवशरण धाराशिवे डॉ. जयशंकर बेरूळे, विजय कदम, मन्मथ स्वामी, विलास जाधव,डॉ. शरद साबळे ग्रामपंचायत आलमला, शिवाजी खिचडे, एडवोकेट उमाकांत नाईक नवरे व जयशंकर लोहारे यांचाही पुष्पगुच्छ व दिनदर्शिका भेट देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास सं. अध्यक्ष शिवकुमार आंबुलगे,अध्यक्ष रविकिरण खिचडे, सदस्य विरणाथ निलंगेकर,संगमेश्वर पाटील , रमाकांत पाटील, राम कापसे, योगेश खिचडे, सुमन बोरुळे, उमा कोरे, सविता घवले, जयनंदा विभुते,आशिष पावले, रोहिदास माने, धोंडीराम निलंगेकर, पार्वती अडसुळे, जयश्री जावळे, महेश गांधले व राहुल हाजगुडे इत्यादी सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन धनाजी गुरव यांनी तर महिपाल ठाकूर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post