भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
दिवाळी सण संपताच ग्रामीण भागात एकच लगबग सुरू होते, ती म्हणजे गावचा पारंपरिक गावदेव कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमाला प्रत्येक गावात अनन्यसाधारण महत्त्व असते. गावदेव झाल्याशिवाय लग्न, साखरपुडा, नवीन घर बांधणे अशा शुभ कार्यांचा प्रारंभ होत नाही. प्रत्येक गावात असलेल्या वाघोबा मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र जमून रात्रभर विविध आदिवासी देवतांची पूजा केली जाते. वाघोबा, यांसारख्या देवतांला डमरू,(डाक) सनई वाजवून व श्रद्धेने अभिवादन केले जाते. पुजारी त्या देवासमोर वारे (झुणतात) घेतात, नैवैद्य दाखवतात काहि पुजारी प्रत्येक देवांची गाण्यातुन त्यांची कथा सांगुन जागरण करतात.हि परंपरा पुर्वजापासुन सुरू आहे. गावाच्या विकासासाठी
गावदेव कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गावातील सर्वजण एकत्र बसून गावाच्या विकासावर चर्चा करतात. आवश्यकतेनुसार नवीन नियम, कायदे तयार केले जातात. यानंतर महाप्रसादाचा लाभ घेत ग्रामस्थ आपापल्या घरी परततात.
पाच वर्षांनंतरचा विशेष गावदेव कार्यक्रम असतो या दिवशी काही
गावांमध्ये पाच वर्षांनी विशेष प्रकारचा गावदेव कार्यक्रम होतो, ज्यामध्ये बिऱ्हाड काढले जाते. बिऱ्हाड दिवशी नवीन देवाची मूर्ती बनवतात या प्रथेनुसार ग्रामस्थ एक दिवस पुरेल इतके धान्य घेऊन गावाच्या वेशीबाहेर रात्री मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी वेशीवर तोरण बांधून गावात प्रवेश करतात आणि गावदेवाचे दर्शन घेतात.
गावदेव कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते. एकत्र येण्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होते आणि ग्रामस्थांमध्ये एकजूट निर्माण होते.
रविंद्र पुंजारा ग्रामस्थ बऱ्हाणपुर-
हा पारंपरिक उत्सव गावकऱ्यांच्या संस्कृतीचे आणि सामाजिक जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. तो केवळ परंपरा जपण्याचा नाही, तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा उत्सव आहे.


Discussion about this post