जिवन पट….
▪नांव:-प्रा. विजय रामचंद्र रायमल
▪वडिलांचे नांव:- स्व.रामचंद्र यशवंत रायमल
▪आईचे नांव ः- स्व.मंदोधरी रामचंद्र रायमल
▪मुळगांव:- सावरगांव माळ ता.सिंदखेडराजा जि. बुलढाणा
▪जन्मगाव: – देऊळगावराजा जि. बुलढाणा
▪जन्मदिनांक:- 12 जानेवारी 1967
▪शिक्षण: -D.E.E. /B.A./M.A.
▪ कौटूंबीक परिस्थिती:-
वडील पूर्वी पासून बलूत्यावर सुतारी काम करायचे त्यांना 3 मुली व माझ्या सह 4 मुले असा मोठा परिवार होता . . . त्यामुळे लहान असतांना घरची परिस्थिती खुप बेताची होती . . . पर्यायाने वडीलांनी माझ्या जन्मापूर्वीच मुळ गांव सोडून देऊळगांवराजा शहर गाठले . . . उद्देश एकच कामधंदा मिळेल व मुलांना शिक्षण देता येईल . . . तो खऱ्या अर्थाने सिध्द झाला . . . पण खरी कोंडी केली 1972 च्या दुष्काळ पडला अन आमचे कुटूंबाची अन्न अन्न दशा झाली . . . त्यामुळे माझे शिक्षण दोन वर्ष जवळ जवळ बंदच झाले . . . त्या काळात मी 8 वर्षाचा असतांना वडिलाच्या हाताखाली रंधा – करवत ओढणे . . . औताला होल – कुस घेणे यासारखे मेहणतीचे कामे केले . . . अजुनही मी हे सर्व कामे सहज करू शकतो पण आधूनिक तंत्रज्ञान आल्याने मशीनद्वारे आता ते कामे होतात. . . वडीलांच्या हाताखाली 10 व्या वर्गात येईपर्यंत कामे केली पण माझे वडील दुर दृष्टीचे असल्याने त्यांनी आमचे शिक्षण रडत पडत का होत नाही बंद केले नाही . . . त्यांचे म्हणने होत बाळांनो सावलीतील कामे करा त्यासाठी शिक्षणाची कास धरा हे बोलच मला सुतारी कामे करून वर्ग 10 मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यासाठी कामी आले . . . त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही . . . पॉलिटेक्नीकला मी 1989 ला इलेक्ट्रिकल इंजीनीअररिंग ब्रँचला संपूर्ण कॉलेज मधून प्रथम आलो . . . मग सुरू झाली उदर भरणासाठी वाट धरली तत्कालीन औरंगाबाद शहराची तेथे प्रत्येक कंपनीला जॉब मिळावा म्हणून खुप खेटे घेतले परंतू कुणी गॉड फादर नसल्याने सरकारी नोकरी व कंपनीची नोकरी मिळाली नाही . . . एक महिन्याच्या तपस्ये नंतर एका सेल्समनची नोकरी रू.500 महिन्याने मिळाली . त्याची ड्यूटी 12 तासांपेक्षा जास्त करावी लागे म्हणून टेक्नीकल जॉब मिळण्यासाठी प्रयत्न केला तेंव्हा कुठे एका रबर कंपनीत सुपरवाईजरची नोकरी मिळाली पण तेथे 6 महिन्यापेक्षा जास्त कुणीच वर्कर टिकत नसे कारण रबराचे कण नाका तोंडात गेल्याने तो कामगार किंवा इंजीनिअर फुफ्फूसांच्या रोगाने ग्रस्त होत असे माझे पण तेच झाले 5 महिन्यातच ती नोकरी सुटली . . . काय करावे या विवंचनेत असतांना एका लहानपणीच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रेक्टर मित्राने माझी विवंचना पाहून त्याच्या सोबत काम करण्यासाठी सुचवले . . . त्याच काळात घरच्यांनी 18 मे 1993 मध्ये माझे दोनाचे चार हाथ केले व सौ. उज्वला ही माझी नववधू म्हणून दे.राजा येथे नांदण्यास आली . . . माझा चंचल व धडपडा स्वभाव मला कधी कधी मिळणाऱ्या या ठेकेदारीच्या कामावर समाधानी नव्हताच . . . पण म्हणतात ना ! कधी कधी संधी चालून येते तेंव्हा एकदमच सर्व बाजूंनी येते त्यापैकी पहिली संधी म्हणजे आमचे बालपणीच्या चार मित्रांनी शुद्ध शाकाहारी हॉटेल पार्टनरशिप मध्ये टाकण्याचा विचार केला व त्यास पूर्णत्वास पण नेला . . . आज संपूर्ण परिसरात जी हॉटेल चैत्रबन म्हणून नांवारूपास आली तीचा मी फाऊंडर मालक होय . . . हॉटेल सुरू केली पण त्याच कालावधीत मला औरंगाबाद येथील तत्कालीन खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या गोदावरी -प्रवरा उपसा जलसिंचन योजना मध्ये वैजापूर येथे चीफ इंजीनीअरची नोकरीची ऑफर आली . . . पण त्यांच्या काही बाँडच्या अटी असल्याने ती मी नाकारली . . . हॉटेलची रात्र शिफ्ट असतांनाच मला 1994 मध्ये दुसरबीडच्या कॉलेजवर एक जागा इले. इंजीनीअरची आहे असे कळाले मी सहज इन्टरर्व्हूला गेलो तर त्यां संस्थेचे निःस्वार्थी / कर्मयोगी अध्यक्ष स्व. आप्पासाहेब देशमुख राहेरीकर यांनी माझ्या स्पष्टोक्त स्वभावामुळे उद्याच जॉइन होण्यास सांगीतले . . . त्यामुळे मी हॉटेलेची रात्री ड्यूटी करून दिवसा कॉलेजवर शिकविण्याचे काम करू लागलो दैव योगाने त्याच वर्षी ग्रँट मिळाल्याने माझा सरकारी पगार सुरू झाला . . . त्यामुळे रात्री 3 ते4 वाजे पर्यंत हॉटेल ड्यूटी व दिवसा कॉलेज करणे मला शक्य होईना म्हणून मी हॉटेलची पार्टनरशिप काढून घेतली . . . तेव्हापासून पूर्ण लक्ष कॉलेजच्या शिकविण्यावर केंद्रित केले . . . असा जीवन प्रवास सुरू होवून 31 ऑक्टों. 2024 ला मी अभिमानाने सांगेल समाधानाने निवृत्त झालो . . . समाधान विद्यार्थ्यांना घडविण्याचे . . . त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे . . .
▪नोकरी:-
प्राध्यापक म्हणून दुसरबीड येथील जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालय येथे गेली 30 वर्ष सेवा दिली. सेवा काळात जेमतेम बाँड्रीवर पास झालेल्या वर्ग 10 उत्तीर्ण विद्यार्थी आमच्या MCVC अभ्यासक्रमाकडे येत असे … त्यांच्या हाताला कौशल्य प्राप्त करून पायावर उभे राहण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे . . .
▪असंख्य विद्यार्थ्यांना व्यावसाईक शिक्षण देवून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले . . . ज्यांनी हार्ड वर्क केले त्यापैकी 42 जण आज इंजीनीअर झालेत . . .
▪अनेक जण उद्योजक झाले त्यापैकी काहींचे पुणे , छ.संभाजीनगर येथे कंपनी आहे . . . काही दुसरबीड परिसरातील सर्वच गांवा गांवात माझेच विद्यार्थी तंत्रज्ञ झाले व गांवातच मोटर रिवाइंडीग शॉप . इले. वायरींग प्लंबिंग तथा इले. उपकरणे दुरुस्तीचे दुकाने टाकुन कुटूंबाचा प्रपंच सांभाळत आहेत . . . तत्पूर्वी ग्रामीण भागातील गांवकऱ्यांना वरील सर्व कामे करण्यासाठी शहरात जावे लागत असे . . . आता हेच कामे माझेच असंख्य विद्यार्थी करत आहेत . . . त्यामुळे माझ्या व्यवसाय शिक्षणाचे उद्दीष्ठ पूर्ण झाले आहे . . .
▪समाजसेवा :-
समाजसेवेचे वेड स्वताः हालाखीत शिक्षण घेतल्याने वडिलांच्या पुण्याईनेच मिळाले कारण वडीलांनी त्यांच्या हयातीत अनेक सुतारी कामे करणारे कारागीर घडवीले . . . आजही देऊळगांवराजा शहरात व परिसरात जे काही सुतार कारागीर आहेत ते सर्वच वडीलांच्या हाताखाली तयार झाले आहेत .
टर्नींग पॉईंट प्रभू विश्वकर्मा रथयात्रा : – मा. नागोजीराव पांचाळ सर यांनी मे 2015 मध्ये जी रथयात्रा काढली तेव्हा महाराष्ट्रात अनेक गावा गावात जाण्याचा योग आला तेथील आपल्या सुतार समाज बाधवांना भेटण्याचा व त्यांच्या अडचणी समजुन घेण्याचा प्रयत्न केला व तेंव्हा पासून समाज कार्यास झोकुन दिले . . .
▪केलेले निवडक समाज कार्य . . .
1)मातला या गावच्या स्व. संजय जवंजाळ या समाज बांधवाचा गावच्याच एका व्यक्तीने खुन केला असता त्याचे कुटुंबीय उघड्यावर आल्याने त्यासाठी मी महाराष्ट्रभर मिडीयावर आव्हान करून त्याच्या 10 व्या पूर्वी त्याच्या कुटूंबाला जवळपास 2 लाख रुपये मदत मिळवून दिली त्यात आपल्या आदरणीय आमदार डॉ.संजय रायमुलकर साहेबांचा सिंहाचा वाटा होता . . . तसेच त्या मयत व्यक्तीच्या दोन मुलांना हिवराश्रम येथील आश्रमात शिक्षणासाठी ठेवले व त्याच्या पत्नीला पण तेथे रोजगार मिळवून दिला . तव्दतद खुनी व्यक्तीला न्यायालया पर्यंत नेवून त्याला कोर्टाने सजा देण्यास भाग पाडले .
2)ST महामंडळाच्या बसने आपला एक समाज बांधव स्व. विठ्ठल शिंदे याला अपघात झाल्याने मृत्यू झाला ती बस सर्वप्रथम आम्ही अडवून पोलीस स्टेशनला जमा केली त्यामुळे सदर वर्धा डेपोच्या त्या ST ने सदर मृतकाच्या परिवारास जवळ पास 5 लाख रू. नुकसान भरपाई दिली .
3) सिनगाव जहागीर येथील देवीदास इंगळे यांच्या घरी सिलेंडर स्फोट झाला असता सर्व संसार उध्वस्त झाला असता स्थानीक आमदार डॉ . शशीकांत खेडेकर यांच्या कडून 24 तासाच्या आत 1 लाख रू सदर कुटुबास मिळवून दिले व गॅस कंपनीच्या इन्शुरन्ससाठी पाठपुरावा करून 5 लाख रू कंपनीकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचा संसार उभा राहिला . . .
4) करोना काळात जास्तीत जास्त किराणा सामान किट बनवून बुलढाणा जिल्ह्यातील समाज बाधवांना वाटप केल्या
5) स्वताःहा करोना संकटात सापडलो असूनही माझ्या ऐवजी मा. आमदार साहेबांना मेरा बु ॥ येथील सुरोसे या कुटुंबाचे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सर्व संसार उद्धवस्त झाला असता 25 हजार रू. त्यांना मदत पोहचवली .
6) मंबई येथील डॉ .श्रध्दा पांचाळ या भगीनीचा रेप मर्डर झाला असता आमदार साहेबांना सर्व माहिती दिली असता साहेबांनी विधान सभेत हा प्रश्न टाकल्याने त्या भगीनीच्या मारेकरी पोलीसांनी पकडून त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे .
7) येडशी जि. धाराशिव येथील समाज बांधवाने आत्महत्या केल्याने त्याचे कुटूंब निराधार झाल्याने सर्व प्रथम आमदार साहेबांनी 1 लाख रू.ची मदत मी पोहचवली व संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू होवून त्या कुटुंबाला घरकुल व 10 लाख रुपयांची मदत झाली आहे .
8) या व्यतीरिक्त सेवा काळात अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मी केली त्यामुळेच गरीबांच्या मुलाना घडविण्याचे पुण्य मिळाले आहे . . .
9)24 डिसेंबर 2023 ला राज्यस्तरीय सुतार समाज अधिवेशन घेण्यासाठी जे काही केले त्याचे फळ म्हणून आमदार साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेबांकडून संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले .
वरील समाज कार्य ठळकपणे आहेत बाकी छोटे मोठे विद्यार्थी गुण गौरव . . . संत भोजलींग काका यांच्या कार्याचा प्रचार प्रसार आज ही सुरू आहे
Discussion about this post