शंकरराव ढगे
अर्धापूर, प्रतिनिधी
परभणी येथील भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची तोडफोड करून देशविरोधीकृत्य करणाऱ्या समाज कंठकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भोकर फाटा ता. अर्धापूर येथे दि.१२ डिसेंबर रोजी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळया समोरील भारतीय संविधानाची तोडफोड दि.१०/१२/२०२४ रोजी करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या समाज कंठकावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक १२/१२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता भोकर फाटा, ता. अर्धापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदन मा. पोलीस निरीक्षक अर्धापूर यांना देण्यात आले आहे या निवेदनावर दिनेश लोणे पाटणुकर जिल्हाध्यक्ष युवा पँथर नांदेड जिल्हा, आकाश सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष युवा पँथर नांदेड जिल्हा, अंकुश सावते जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी सेना नांदेड जिल्हा, संतोषकुमार साळवे जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा, अशोक आठवले तालुका अध्यक्ष आरपीआय (आठवले गट), सुरेश सावते मा. जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना नांदेड जिल्हा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Discussion about this post