
श्रीगोंदा (प्रतिनिधी) ,
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम गुणवत्ता कक्ष, विद्यार्थी कल्याण मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
“भारतीय राज्यघटनेची ओळख” या विषयावर ॲड. प्रा. अनिल ढवळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेची मूलभूत मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्ठा ही आहेत. ही मूल्ये भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत. देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. असे ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. महादेव जरे यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ . प्रकाश साळवे यांनी संविधानाच्या अध्ययनाने समृद्ध नागरिकत्व विकसित होऊ शकते. धर्मनिरपेक्षता टिकून ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये सहिष्णुता आणि सामंजस्य असणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर निर्मिती स्पर्धा यांसारख्या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याशिवाय, राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. अर्चना फुलारी यांनी केले. आभार समन्वयक प्रा. डॉ. हरिभाऊ वाघिरे यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. रमेश थोरात, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. सुप्रिया पवार, प्रा. सिद्धार्थ बर्वे, डॉ. राजाराम कानडे, प्रा. देवेंद्र बहिरम, प्रा. नाना वागस्कर, प्रा. वैशाली घोडके महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post