शंकरराव ढगे
अर्धापूर, प्रतिनिधी
परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळील असलेल्या संविधान शिल्पाचे नुकसान करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करा. अर्धापूरातील आंबेडकरी अनुयायींनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदनाद्वारे केली मागणी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील स्मारका जवळील संविधान प्रत शिल्पाला एका समाज द्रोहीने सामाजिक स्वास्थ बिघडवण्याच्या हेतूने, जाणून बुजून तोडफोड करून संविधानाची विटंबना करण्यात आली आहे या घटनेचा अर्धापूर तालुक्यातून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. सबंधित व्यक्तीवर कायदेशीर कड़क कारवाई करत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून योग्य शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी तहसिलदार अर्धापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उमाकांत सरोदे, विनय मोरे, शरद सरोदे, दिपक मगर, भिमराव सरोदे, विशाल नरवाडे, राजाराम सरोदे, जयभीम सरोदे, भगवान सरोदे, पंकज सरोदे, आकाश सरोदे, किरण सरोदे, देविदास दातार, भीमा कांबळे आदी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री यांनी परभणी येथील घडलेली घटना खूप निंदनीय असून अश्या घटना पुन्हा राज्यात होऊ नये यासाठी कठोर पावले उचलून राज्यभरातील सर्व महापुरुष यांच्या स्मारकाला सुरक्षा देण्याय यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करून राज्य बंद करण्यात येईल असा तीव्र इशारा आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे.

Discussion about this post