मानोरा येथील उत्कर्ष नवोदय कोचिंग क्लासेस चा नवा उपक्रम
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा – स्थानिक एलएसपीएम हायस्कूल धामणी मानोरा येथे उत्कर्ष नवोदय कोचिंग क्लासेस मार्फत घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय सराव परीक्षेत ३८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.मानोरा, रिसोड मालेगाव, मंगरूळनाथ, कारंजा, दिग्रस,सेलू बाजार येथील विद्यार्थ्यांच्यख यात सहभाग होता.
परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण ८ डिसेंबर रोजी व्ही बी पाटील अध्यक्ष एलएसपीएम हायस्कूल धामणी मानोरा यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे अनिल पवार गटशिक्षणाधिकारी पं. स. मानोरा, अनिल जाधव संचालक उत्कर्ष नवोदय कोचिंग क्लास, प्राचार्य एच.जे. हांडे, सुधीर काळे केंद्रप्रमुख, गोपाल चव्हाण गोरसेना यांच्या उपस्थितीत पार पडला.
या परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रथम २० विद्यार्थ्यास प्रोत्साहन पर शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा. अनिल जाधव यांनी १८ जानेवारी रोजी होणारे नवोदय मुख्य परीक्षेत विद्यार्थी कशाप्रकारे चुका करतात व त्या कशा दुरुस्त कराव्यात, त्याच्या परीक्षेबद्दलची भीती कशी दूर करावी यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही बी. पाटील यांनी
विद्यार्थ्यांनी अधिक जोमाने अभ्यासाला लागावे व मुख्य परीक्षा पात्र होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी भविष्यात कशाप्रकारे स्पर्धा येतात व त्यांच्यावर कशा प्रकारे मात करावे कराव्या यावर मार्गदर्शन केले.
जवाहर नवोदय सराव पेपर जिल्हास्तरीय राबवण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे मुख्य परीक्षेत होणाऱ्या चुका व परीक्षा बद्दल होणारी मनातील भीती टाळण्यासाठी सतत १० वर्षांपासून उत्कर्ष नवोदय क्लासेसचे संचालक अनील जाधव हे ऊपक्रम राबवत असतात.
विद्यार्थ्यांना या परीक्षेचा फायदा असा होतो की मानोरा तालुका मधून त्याच्या क्लासेस मधून आतापर्यंत ३६ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे प्रवेश पात्र झाले आहे व इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा चांगल्या प्रकारे होत आहे.
ही परीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य पंकज चव्हाण, पवन राठोड,अस्मिता जाधव, विशाल बेले, शिवानी उंबरे, देवा खडसे प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन गोपाल चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन अस्मिता जाधव यांनी केला
Discussion about this post