
हवेली तालुका प्रतिनिधी..
नाट्यभिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापक समराधनम: ह्या संस्कृत उकलीच्या अर्थाप्रमाणे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि त्यांना नाटक पाहण्याची रुची निर्माण करून समाधान देणारे एक नवीन कोरं विनोदी नाटक व्यावसायिक रंगमंचावर येतंय. “हाऊसफुल्ल” हे नाटकाचं नाव असुन राजीव पाटील फिल्म प्रॉडक्शन च्या अंतर्गत ह्या नाटकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. रोमँटिक लव्ह-स्टोरी चा अँगल असलेल हे नाटक प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातुन 2 तास लोकांचं निखळ मनोरंजन करत.
ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक महेश रोहिणी असुन राजीव पाटील ह्यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे. नाटकाचे भव्यदिव्य सेट्स गणेश राऊत आणि सुरज वांजळे ह्यांनी बनवले असुन ह्या नाटकाचं संगीत आपल्याला मंत्रमुग्ध करत. शुभारंभाचे प्रयोग पुणे मधील कोथरूड आणि हडपसर मधुन होणार असुन नंतर अखंड महाराष्ट्रात ह्याचे प्रयोग वेगाने सुरु होतील. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी रोमँटिक लव्ह स्टोरी च्या मार्फत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी कुणीही चुकवू नये असे हे नाटक व्यावसायिक रंगभूमी वर दाखल होत आहे..
Discussion about this post