एकात्मिक बालविकास सेवा योजना, सामुंडी/ टाकेदेवगाव विभाग, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युनिसेफ चे राज्य सल्लागार मा. डॉ. गोपाल पंडगे सर, Dy.CEO(महिला व बालकल्याण) मा. प्रताप पाटील सर, CDPO मा. भारती गेजगे मॅम, सरपंच श्री. अशोक गवारी साहेब, मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, पत्रकार प्रभाकर गारे, अंगणवाडी ताई, आशा, ANM, CHO, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..यावेळी डॉ.पंडगे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत हिमोग्लोबीन चे महत्व, बालविवाहचे होणारे दुष्परिणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तर मा.पाटील सर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणामुळे बालविवाह कसे रोखले जातील याबाबत मार्गदर्शन केले..
CDPO गेजगे मॅम यांनी स्वअनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करत बालविवाह थांबविण्याने आव्हान उपस्थितांना केले..सामुंडी व टाकेदेवगाव विभागात उत्कृष्टरित्या सुरु असलेले Neonatal Care n Management Project, ECD activity व आरंभ अंतर्गत उत्कृष्ट पालक मेळाव्याचे आयोजन या बद्दल आरंभ टीम व युनिसेफ महाराष्ट्र यांच्यावतीने सामुंडी/ टाकेदेवगांव विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, BF, ANM, MPW, CHO, MO, ग्रामपंचायत अस्वलीहर्ष, ग्रामपंचायत पहिने, जिल्हा परिषद शाळा- पुलाचीवाडी, Dy.CEO पाटील सर, CDPO गेजगे मॅम, पर्यवेक्षिका श्वेता गडाख अशा एकूण 70 अधिकारी/ कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.. यावेळी टॅलेंट सर्च परिक्षेत अव्वल येऊन राष्ट्रपती भेटीची संधी मिळालेला अस्वलीहर्ष येथील अमोल गोहिरे या भिलमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.. किशोरी व अंगणवाडी ताईनी Anemia free India, बेटी बचावो, बालविवाह निर्मूलन या वर आधारित रांगोळ्या काढल्या होत्या.. सेल्फी पॉईंटचे ही आयोजन करण्यात आले होते.. वाघ सर यांनी सूत्रसंचलन केले तर पर्यवेक्षिका श्वेता गडाख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले..
सामुंडी विभाग, प्रकल्प त्र्यंबकेश्वर..
Discussion about this post