सारथी महाराष्ट्रचा उमेश धुमाळ
पिंपळवाडी) येथील निवासी राजश्री सोपान ढेंबरे ह्यांचा मालकीचा असलेला खामगाव येथील गट नंबर 423 हा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने वाटप केला होता. सदरचे क्षेत्र मिळून सुद्धा श्रीमती ढेबरे यांना मिळालेले क्षेत्र कसावयास अद्याप मिळालेले नव्हते. सदर क्षेत्र मिळवण्यासाठी श्रीमती राजश्री सोपान ढेबरे यांनी कसलाही विचार न करता आलेल्या सर्व परिस्थितीशी सामना करून शासनाशी त्या गेली बारा वर्ष लढा लढत होत्या त्या लढ्यास अखेर यश आलेले आहे व बारा वर्षानंतर माननीय प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार अभिजीत जाधव साहेब यांनी विशेष प्रयत्न करून अखेर खंडधारकांना त्यांची नावे असलेला सातबारा तयार करून दिला त्याबाबत त्यांचे खूप खूप अभिनंदन सदर लढ्यास खंडकरी यांना वेळोवेळी ॲड.अजित सी पठाण ॲड.मयुरी सी शहा व ॲड.केदार एस शिर्के यांनी विशेष सहकार्य केले.
Discussion about this post