पंचायत समिती कार्यालय येथून मिळणारे जन्म आणि मृत्यू दाखले ऑफलाईन मिळत असून सदर ऑफलाईन दाखले शासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी वैध नसतात सर्व ठिकाणी ऑनलाइन बारकोड असलेले दाखले मागितले जातात त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी अनेकवेळा चकरा मारून सुद्धा काम होत नसल्यामुळे मनस्ताप होतो. म्हणून शिवसेनेच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यलय मुक्ताईनगर यांना ऑनलाइन दाखले नागरिकांना उपलब्द्ध करून द्यावे यासाठी निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख नवनीतभाऊ पाटील, मोहन बेलदार, विनोद पाटील, अमोल पाटील , शैलेश पाटील , दिलीप पाटील, विष्णू पाटील यावेळी उपस्थित होते…!!
Discussion about this post