कुरुंदवाड प्रतिनिधी/ परभणी शहरातील प्रमुख चौकात महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा आहे या पुतळा परिसरामध्ये संविधानाची प्रतिकृती देखील आहे पण एका नालायक निच्च विचाराच्या नराधमाने संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान केले आहे.
आंबेडकरी समाजाच्या नव्हे तर भारत देशाच्या पवित्र ग्रंथाचा हा अवमान आहे. ज्या संविधानावर हा देश चालतो त्या देशात अशी घटना घडने हे अंत्यत निंदनीय आहे आणी सध्या भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे आणी ज्या नराधमाने हे कृत्य केले आहे त्याचावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व हे घडवण्यास जो कोणी सहभागी आहे
त्याचा ही शोध लवकर घेण्यात यावा अन्यथा संतप्त आंबेडकरी समाज महाराष्ट्रभर आंदोलन उभारल्या शिवाय राहणार नाही यांची दखल प्रशासनाने घ्यावी. पोलिस प्रशासनाने परभणी येथील भीमनगर मध्ये कोबिंग आँपरेशन सुरु केले आहे ते थांबवावे व ज्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे काठी असताना भिमसैनिकांना लोखंडी राँडने मारहाण केली आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही विनंती व उद्या कुरुंदवाड शहरात उद्या घडलेल्या घटनेची निषेध फेरी काढण्यात येणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी जय संविधान जय भारत जय भिम
असे निवेदन कुरुंदवाड येथील बौद्ध समाजाच्या वतीने कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पीएसआय फडणीस यांना देण्यात आले यावेळी धम्मपाल ढाले, सुरेश शिंदे, अमोल कांबळे, सुशांत ढाले, अनिकेत गोरे, राहुल कांबळे, जयदीप मधाळे, अभिनंदन मधाळे, आलोक कडाळे, संजय शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते…
Discussion about this post